ladki bahin yojana installment: नमस्कार लाडक्या बहिणींनो महाराष्ट्र सरकारचे अत्यंत महत्त्वकांक्षी आणि लोकप्रिय योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींनो या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा पंधराशे रुपयाची थेट मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये दिली जाते.
परंतु 2026 च्या नवीन अपडेट नुसार अनेक महिलांच्या बँक खात्यामध्ये मार्च एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते अद्याप देखील जमा झाले नाहीत त्यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाडक्या बहिणींना महाराष्ट्र शासनाने केलेल्या अत्यंत कडक स्क्रूटनी आणि ई-केवायसी प्रक्रियेनंतर महाराष्ट्र राज्यातील सुमारे 70 लाख महिलांचे अर्ज विविध त्रुटींमुळे अपात्र ठरवण्यात आले आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे या अर्जांमधून एक कोटी 77 लाख महिला अंतिम पात्र यादीत लाभार्थी म्हणून निश्चित झाल्या आहेत.
majhi ladki bahin yojana list 2026 | लाडकी बहीण योजना पात्र-अपात्र यादी कशी पाहावी?
तर लाडक्या बहिणींनो तुमचे देखील पंधराशे रुपये बंद झाले तर नाहीत ना? किंवा नवीन लाभार्थी यादीत तुमचे नाव कट झाले आहे की नाही? हे सर्व तुम्ही तुमच्या मोबाईलवर घरबसल्या तपासू शकता आता याची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे का बंद होऊ शकते?
लाडक्या बहिणींनो तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे मागील हप्ते सुरळीत मिळाले असतील पण अचानकच केवायसी प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा तुम्हाला पैसे येणे बंद झाले असतील तर त्याची काही तांत्रिक तसेच प्रशासकीय कारणे देखील असू शकतात आणि महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र शासनाने गैरव्यवहार टाळण्यासाठी 2026 मध्ये ही तपासणी अत्यंत कडक केली आहे.
बँक खात्याशी Aadhar Seeding नसणे
महाराष्ट्र सरकारच्या नियमानप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा पैसा थेट महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतो पण लाडक्या बहिणींनो जर तुमचे बँक खाते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक नसेल किंवा ते Inactive झाले असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया जमा होणार नाही आणि याच कारणामुळे अनेक महिलांचे पैसे येणे बंद झाले आहे म्हणून लवकरात लवकर तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घ्या.
DBT पर्याय चालू नसणे
महाराष्ट्र शासनाकडून पाठवला जाणारा निधी हा बँक खात्यामध्ये मिळवण्यासाठी तुमच्या खात्यावर Direct Benefit Transfer Active असणे अनिवार्य आहे लाडक्या बहिणींनो जर तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असून सुद्धा बँकेत DBT पर्याय सुरू नसेल तर सरकारी अनुदानाचा पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार नाही.
फॉर्ममध्ये किंवा eKYC मध्ये त्रुटी असणे
महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबर पासून ते एप्रिल 2026 च्या अखेरपर्यंत महिलांना एक केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अंतिम मुदत दिली होती आता ज्या महिलांनी ही केवायसी प्रक्रिया पूर्णच केली नाही किंवा ज्यांच्या अर्जात नाव जन्मतारीख आणि रेशन कार्ड च्या माहितीमध्ये तफावत आढळली आहे अशा महिलांचे अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र ठरवण्यात आले आहे.
तुमचे नाव पात्र यादीतून कट झाले आहे का? असे तपासा
जर तुमचा अर्ज Approved किंवा Disapproved/Rejected झाला तर नाही ना तर हे तपासण्यासाठी मी तुम्हाला खालील अत्यंत सोप्या स्टेप्स समजून सांगितले आहे या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अर्जाचे स्टेटस तपासून शकता.
- सर्वात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर (ladakibahin.maharashtra.gov.in) जा.
- मुख्य पानावर असलेल्या ‘अर्जदार लॉगिन’ (Applicant Login) या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर, पासवर्ड आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा (Captcha) कोड टाकून लॉगिन करा.
- लॉगिन झाल्यानंतर, तुमच्या प्रोफाईल मेनूमध्ये ‘यापूर्वी केलेले अर्ज’ (Application Status) या पर्यायावर क्लिक करा.
- येथे तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती दिसेल. जर तिथे Approved लिहिले असेल, तर तुमचे नाव सुरक्षित आहे.जर तिथे Rejected किंवा Disapproved लिहिले असेल, तर तुमचे नाव यादीतून कट झाले आहे.
लाडकी बहीण योजना नवीन लाभार्थी यादी 2026 कशी पाहायची? | ladki bahin yojana installment
महाराष्ट्र शासनाने एप्रिलच्या अखेरपर्यंत सर्व पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे 01 कोटी 77 लाख महिलांची नवीन अंतिम लाभार्थी यादी देखील महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे आता ही यादी पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स चा वापर करू शकता.
ऑनलाईन यादी पाहण्याची सोपी पद्धत
- लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट किंवा ‘Nari Shakti Doot’ App ओपन करा.
- ‘Beneficiary List’ (लाभार्थी यादी) या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा जिल्हा (District), तालुका (Taluka) आणि गाव/वॉर्ड (Village/Ward) निवडा.
- ‘शोध’ (Search) बटणावर क्लिक करताच तुमच्या गावातील पात्र महिलांची संपूर्ण यादी पीडीएफ (PDF) स्वरूपात समोर येईल. त्यात तुम्ही तुमचे नाव शोधू शकता.
NOTE : जर ऑनलाईन यादी पाहण्यात अडचण येत असेल, तर तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कार्यालय किंवा सेतू केंद्र (CSC Center) येथे जाऊन शासनाने प्रसिद्ध केलेली नवीन यादी पाहू शकता.
अर्ज Reject किंवा अपात्र झाला असल्यास काय करावे
लाडक्या बहिणींनो जर तपासणी दरम्यान तुमचा अर्ज अपात्र ठरला असेल किंवा तुमचे नवीन यादी मध्ये नाव नसेल तर घाबरून जाण्याची काहीही गरज नाही कारण महाराष्ट्र शासनाने दिलेल्या माहितीनुसार अनेक महिलांचे अर्ज केवळ कागदपत्रांच्या तांत्रिक त्रुटींमुळे प्रलंबित किंवा रिजेक्ट झाले आहेत
Ladki Bahin Yojana List 2026 (New) – Check Name Online Using Aadhaar Number
अपात्र महिलांसाठी सुधारणेच्या संधी
लाडक्या बहिणींना नुकतेच महिला व बाल विकास विभागाने हे स्पष्ट केले आहे की अपात्र महिलांनी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी थेट जिल्हा कार्यालयामध्ये गर्दी करू नये कारण महाराष्ट्र शासनाकडून लवकरच अपात्र किंवा प्रलंबित राहिलेल्या अर्जाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या जातील आणि या सूचना पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला बघता येतील.
बँक खात्याचे DBT Status ऑनलाईन कसे चेक करावे?
तुमचे पैसे खात्यात का आले नाहीत, हे जाणून घेण्यासाठी तुमचे DBT Status Active आहे की नाही हे तपासणे सर्वात महत्त्वाचे आहे.
| Step No | Process | Action |
| 01 | अधिकृत वेबसाईट | आधारच्या uidai.gov.in किंवा myAadhar पोर्टलला भेट द्या. |
| 02 | पर्याय निवडा | ‘Bank Seeding Status’ (बँक सीडिंग स्थिती) या पर्यायावर क्लिक करा. |
| 03 | माहिती भरा | तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाका. |
| 04 | सुरक्षितता | ‘Send OTP’ वर क्लिक करा आणि मोबाईलवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा. |
| 05 | अंतिम स्थिती | स्क्रीनवर तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही आणि DBT Status: Active आहे की नाही ते दिसेल. |
महत्त्वाची सूचना: जर तुमचे DBT स्टेटस Inactive किंवा Not Linked दाखवत असेल, तर त्वरित तुमच्या संबंधित बँक शाखेत जा, तिथून ‘NPCI Mapping Form’ भरा आणि आपले खाते आधारशी लिंक करून DBT सक्रिय करून घ्या.
लाडकी बहीण योजना अधिकृत ॲप आणि वेबसाईट लिंक
| Official Source | Details / Link |
|---|---|
| अधिकृत वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
| मोबाईल ॲप | Nari Shakti Doot (गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध) |
| टोल-फ्री हेल्पलाईन | 181 (तक्रारी आणि प्रश्नांच्या निरसनासाठी) |

